शाळा सुरु करण्याकडे पालकांचा कल; सर्वेक्षणातून आले समोर.

मुंबई दि.11 जुलै – कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल 84 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून (Education Department) करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. या सर्वेक्षणामध्ये (Survey) राज्यातील 2 लाख 25 हजार 194 पालक सहभागी झाले आहेत.
(The tendency of parents to start school; The front came from the survey.)
शालेय शिक्षण विभागाने (Education Department) शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील कोविड मुक्त (corona free) ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग 15 जुलै 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पालक व शिक्षकांकडून विचारणा होत असल्याने शिक्षण विभागाकडून चार दिवस सर्वेक्षण (Survey) करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये अधिकाधिक पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona infection) कमी होत असल्याने कोविड मुक्त (corona free) ग्रामीण भागात ग्राम पंचायत समिती आणि स्थानिक प्रशासनाला आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अन्य वर्गही सुरू करण्यात यावे यासंदर्भात पालकांकडून होत असलेल्या मागणीमुळे पालकांचे (parents) मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला.
पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने 9 जुलैपासून http://www.maa.ac.in/survey ही लिंक उपलब्ध करून दिली. या लिंकवर एकाच दिवसात राज्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 18 हजार 182 पालक, निमशहरी भागातून 23,948 आणि शहरी भागातून 83,064 असे तब्बल 2 लाख 25 हजार 194 पालकांनी आपली मते नोंदवली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी 1 लाख 89 हजार 95 म्हणजेच 83.97 टक्के पालकांनी (parents) आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे तर 36 हजार 99 म्हणजेच 16.03 टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठवण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून 9 जुलैपासून सुरू केलेल्या या सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हे सर्वेक्षण 12 जुलैपर्यंत रात्री 11.55 पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये अधिकाधिक पालकांनी सहभागी होऊन आपले मत नोंदविण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे.
सर्वेक्षणात मत नोंदवलेले पालक
विभाग – पालकांची संख्या – टक्केवारी
ग्रामीण विभाग – 118182 (52.48%)
निमशहरी विभाग – 23948 (10.63%)
शहरी विभाग- 83064 (36.89%)
एकूण – 225194 (100%)
शाळेत पाठवण्यास तयार पालक : 189095 – 83.97%
शाळेत पाठवायला इच्छुक नसणारे पालक – 36099 – 16.03%