धक्कादायक… किल्ल्याच्या टॉवरवर चढून सेल्फी घेणाऱ्या 20 जणांसह तब्बल 50 जण वीज पडून मृत्यूमुखी.

जयपूर दि.12 जुलै – राजस्थानातल्या जयपूरमध्ये (Jaipur) आमेर महलाच्या (Amer Mahal) टॉवरवर वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाज आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकणी वीज कोसळून 30 जणांचा मृत्यू झालाय. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
(Shocking … As many as 50 people, including 20 who took selfies while climbing the tower, died due to lightning.)
राजस्थानातली घटना ही आजवरची सर्वात धक्कादायक घटना मानली जात आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना अनेक जण सेल्फीसाठी टॉवरवर (Selfie on tower) चढले होते. यावेळी टॉवरवर वीज कोसळली. आणि सेल्फीसाठी टॉवरवर चढलेले लोक वीजेच्या धक्क्यानं आजबाजूच्या जंगलात उडाले. आमेर महलच्या (Amer Mahal) टॉवरवर वीज कोसळून झालेल्या मृतांमध्ये तरुणांचा आकडा अधिक होता.
किल्ल्याजवळच्या डोंगरावर हे तरुण वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी काही लोक टॉवरवर सेल्फी (Selfie on tower) घेत होते, तर काही लोक तिथेड डोंगरावर होते. याच टॉवरवर वीज कोसळली आणि ही दुर्दैवी घटना घडली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी वीज कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, “कोटा, धौलपूर, झालावाड, जयपूर आणि बारांमध्ये आज वीज कोसळल्यामुळे दुर्दैवी घटना घडली. पीडित कुटुंबियांबद्दल मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो, देव त्यांना या दुखातून सावरण्यासाठी शक्ती देईल. पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.”
पंतप्रधान मोदींकडूनही शोक व्यक्त
राजस्थानमधील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. यामुळे दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.”