ससे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू ; केज तालुक्यातील घटना.

केज दि.16 जुलै – उसाच्या शेतात ससे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा शेतात लावलेल्या अँल्युमिनियम (Aluminum) तारेच्या कुंपणात सोडलेल्या विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील गदळेवाडी शिवारात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध केज पोलिसात (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(A young man who went to catch rabbits died of shock; Incidents in Kaij taluka.)

केज (Kaij) तालुक्यातील गदळेवाडी येथील शेतकरी बापु अर्जुन शिंदे यांनी त्यांच्या शिवारातील जमिनीतील उसाच्या पीकाच्या शेतातील अँल्युमिनियमच्या (Aluminum) तारेचे कुंपण करून त्यात विजेचा करंट सोडून ठेवले होते. दरम्यान, दि.15 जुलै रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मयत शिवाजी आश्रुबा सांगळे ( वय 19, रा. शिरुरघाट ता. केज ) हा तरुण ससे पकडण्यासाठी या उसाच्या शेतात गेला.

मात्र, ससे पकडण्याच्या प्रयत्नात शेतात प्रवेश करण्यापूर्वी शिवाजीचा तारेच्या कुंपणाला स्पर्श झाला. यावेळी त्याला विजेचा शॉक लागल्याने शिवाजी सांगळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दि.16 जुलै रोजी नांदूरघाट पोलीस (Police) चौकीचे जमादार मुकुंद शामराव ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी बापु अर्जुन शिंदे याच्याविरुध्द केज पोलिसात कलम 304 (अ) भादवी अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!