माझं गावआरोग्य

सावधान…. धारुर शहराला ‘डेंग्यू’चा ताप; दोन दिवसात नऊ बालकांना लागण.

किल्लेधारूर दि.17 जुलै – शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला असताना आता नव्याने डेंग्यू चे रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन दिवसात शहरात नऊ बालकांना डेंग्यू (Dengue) ची लागण झाल्याचे समोर आले असून नगर परिषदेने फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

(Dengue fever in Dharur city; Infected nine babies in two days.)

शहरात गेल्या एक वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव (corona outbreak) रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करत आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून किल्ले धारूर (Dharur) शहरात कोरोना प्रादुर्भाव बरोबर डेंगू रुग्ण सातत्याने कसबा विभागात आढळत आहेत. तुंबलेल्या गटारी, साचलेले पाणी यामुळे इडिस या डासांपासून डेंग्यूचा फैलाव होत असतो.

दि.15 गुरुवार रोजी डेंग्यूची लागण झालेली 5 बालके आढळून आली. तर दि.16 शुक्रवारी यात वाढ होवून आणखी 4 रुग्ण आढळून आली. यामुळे या भागातील जागरुक नागरीक व लोकप्रतिनिधीनी स्थानिक नगर परिषद प्रशासनाला याबाबत सुचना दिल्या. यानंतर दि.16 शुक्रवारी संध्याकाळी नगर परिषद प्रशासनाने प्रभावित परिसरात फवारणीस सुरुवात केली.

कसा होतो डेंग्यू …
डेंगू हा विषाणू (virus) मुळे होणारा आजार आहे. हे विषाणू एडीस (Aedes) नावाच्या डासामुळे पसरतात. हे डास स्वछ पाण्यात अंडी घालतात आणि वाढतात. घरात पाण्याचा साठा केल्यास ह्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. उन्हाळ्यात कुलर च्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत ह्याचा प्रयत्न केल्यास डेंगू व मलेरिया (Dengue and malaria) ह्या दोन आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे डास दिवसा चावतात. त्यामुळे रात्रीप्रमाणे दिवसासुद्धा डासांपासून संरक्षणाची गरज असते .

डेंगूचे प्रकार.
डेंगू चे तीन प्रकार बघायला मिळतात . सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पहिला प्रकार हा थोडा सौम्य असतो. ह्यात ताप , डोकेदुखी , उलटी व अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. दुसरा प्रकार हा जास्त तीव्र असतो व त्यात पहिल्या प्रकारातील लक्षणा सोबतच रक्तस्त्राव होऊ शकतो.

तिसरा प्रकार हा तीव्र स्वरूपाचा असून त्यात रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या डेंगू मुळे रुग्ण दगावू शकतो. तीव्र स्वरूपातील डेंगू ची धोक्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत .
पोटात दुखणे, सारखी उलटी होणे, रक्तस्त्राव होणे, बिपी कमी होणे, लघवी कमी होणे, हातपाय थंड पडणे, दम लागणे, लहान बाळाने सारखे रडणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवणे गरजेचे असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!