कृष्णा सोनटक्के यांचे अपघाती निधन; पुलावरील स्कार्पिओ कोसळली.

किल्लेधारूर दि.18 जुलै – शहरातील बाराभाई गल्लीतील तरुण कृष्णा सोनटक्के (35) हे धारुरहून अंबाजोगाईकडे जात असताना कुंबेफळ येथील पुलावरुन खाली गाडी कोसळल्याने त्यांचे जागीच निधन झाले.
(Accidental death of Krishna Sontakke; Scorpio on the bridge collapsed.)
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील पुलावर आज पहाटे सहाच्या दरम्यान अपघात (Accident) झाला. कृष्णा सोनटक्के आपल्या स्कार्पिओ (Scorpio) क्र.एम.एच. 44 जी.8313 या गाडीने पहाटे धारुरहून (Dharur) केज मार्गे अंबाजोगाईकडे जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलाखाली कोसळली. यात ते जागीच गतप्राण झाले.
अपघाताची माहिती कळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन त्यांचे पार्थिव केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. त्यांच्यावर धारुर येथील वैकुंठ स्मशानभुमीत 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक दत्तात्रय सोनटक्के यांनी दिली.
शहरात अपघाताची माहिती कळताच नातलग घटनास्थळी रवाना झालेत. कृष्णा सोनटक्के हे शहरात सर्वपरिचित होते. यांच्या अकाली अपघाती निधनाने (Accidental death) हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.