कोरोंना विशेष

रविवारी दोनशे पारच…. बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.25 जूलै – बीड (Beed)  जिल्हा प्रशासनाकडे आज 4513 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 208 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4305 जण निगेटिव्ह आली आहेत. गेली सहा दिवस जिल्ह्यात आढळत असलेली बाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-55, अंबाजोगाई-3, आष्टी-37, धारुर-8, गेवराई-13, केज-13, माजलगाव-7, परळी-0, पाटोदा-27, शिरुर-37, वडवणी-8 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

गेल्या पाच दिवसांत बीड जिल्ह्यात तब्बल 21 हजार 143 जणांची तपासणी करण्यात आली. यात 968 जण कोरोना बाधित (Corona positive)  आढळली आहेत. यात आज 208 बाधितांची वाढ झाली. जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने उतरलेली आहे. मात्र बीड जिल्ह्यात अजुनही दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती.
दरम्यान, महाराष्ट्रात 06 हजार 269 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच 07 हजार 332 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 224 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 62 लाख 58 हजार 079 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 60 लाख 29 हजार 817 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 93 हजार 479 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!