सावधान… भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना अटक; दिले गुंगीचे भस्म.

औरंगाबाद दि.26 जुलै – भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना अटक करण्यात आली आहे. गुंगीचे भस्म देऊन या भोंदू बाबांनी लोकांच्या घरात घुसून लूट केली होती. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन आरोपी भोंदू बाबांना पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत.

(Caution … Two robbers arrested under the pretext of fortune telling; The ashes of the given numbness.)
भारतीय समाज तसा श्रध्दाळू व धार्मिक, परंपरा, रितिरिवाज जपणारा आहे. याच स्वभावाचा फायदा घेण्यासाठी अनेक भोंदू बाबा समाजात नाना प्रकारच्या युक्तीचा वापर करुन भोळ्या भाबड्यांची फसवणूक करत असतात. यात भविष्य सांणाऱ्या भोंदूंचा समावेश आहे. अशाच दोन भोंदू बाबांना पोलिसांनी (Police) गजाआड केल्याची घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण?
गुंगीचे भस्म देऊन लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसून ते लोकांना गुंगीचे औषध (Numb medicine) देत असत त्यानंतर त्यांच्या घरात ते लूट करत होते. औरंगाबादमधील मुकुंडवाडी पोलिसांनी चोरी केली गेलेली मालमत्ता हस्तगत करुन 2 भोंदू बाबांना अटक केली आहे.
काळजी घेण्याचं आवाहन
पोलिसांनी लुटेत वापरला जाणारा भस्मही या दोन भोंदू बाबांकडून जप्त केला आहे. भोंदू बाबा आणि अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देणं टाळण्याच्या सूचना पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना दिल्या असून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.



