जिल्ह्याची स्थिती जैसे थे… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.29 जूलै – बीड (Beed) आज बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे 5241 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 212 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5029 जण निगेटिव्ह आली आहेत. आज आष्टीत रुग्ण संख्या अधिक आहे. यापाठोपाठ शिरुर व वडवणीतही संख्या वाढली आहे.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-34, अंबाजोगाई-3, आष्टी-71, धारुर-6, गेवराई-10, केज-12, माजलगाव-7, परळी-2, पाटोदा-17, शिरुर-37, वडवणी-13 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
बीड (Beed) जिल्ह्यातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित आढळत आहेत. यामुळे या तालुक्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. या आदेशाला प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी वाढ दिली आहे. राज्यातही बीड व सोलापूर जिल्ह्यातील वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती.
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 6 हजार 857 नव्या कोरोना बाधित (corona positive) रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या 82 हजार 545 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 82 हजार 914 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 64 हजार 856 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात 286 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 145 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.53 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 नमूने तपासण्यात आले आहेत.