बीड जिल्ह्यात आज आढळले येवढे कोरोना बाधित…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.2 अॉगस्ट – बीड (Beed) आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे 3574 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 167 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3407 जण निगेटिव्ह आली आहेत. आजची सःख्या उतरली आहे मात्र आज कोरोना तपासणी अहवाल कमी आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-37, अंबाजोगाई-1, आष्टी-43, धारुर-4, गेवराई-10, केज-18, माजलगाव-10, परळी-1, पाटोदा-21, शिरुर-18, वडवणी-4 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

बीड (Beed) जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्बंध व विकेँड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आवमेळ पहायला मिळत आहे. राज्यात बीडबाबत चिंता व्यक्त होताना जिल्ह्यात मात्र सतर्कता पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती.
दरम्यान, राज्यात काल (रविवारी) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यात काल 6,479 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 60 लाख 94 हजार 896 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के झालं आहे. राज्यात काल कोरोनामुळे 157 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!