अखेर ठरलं… उद्या लागणार बारावीचा निकाल; कसा पाहणार निकाल….

मुंबई दि.2 अॉगस्ट – राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मोठी घोषणा करत बारावीचा निकाल (12Th result) उद्या दि.3 मंगळवारी दुपारी चार वाजता अॉनलाईन लागणार असल्याचे स्पष्ट केले. बारावीचा निकाल कधी लागणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली.
(It was finally decided … the result of class XII will be available tomorrow.)
“महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.12 वीचा निकाल (HSC Result) उद्या दि.3 ऑगस्ट,2021 रोजी दु.4 वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!”, असे ट्विट करत वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणं आवश्यक होतं.
दरम्यान, बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.
बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?
1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा OR Copy Link http://mh-hsc.ac.in
2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा
4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल
निकाल कसा लावणार:
इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश:
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.
इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश:
इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण
इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश:
बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन (Evaluation) यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.