बीड जिल्ह्याची चिंता वाढली.. आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.6 अॉगस्ट – बीड (Beed) आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे 4822 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 212 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4610 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पुन्हा बाधितांच्या संख्या दोनशेपार गेली आहे.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-49, अंबाजोगाई-5, आष्टी-52, धारुर-6, गेवराई-13, केज-6, माजलगाव-19, परळी-2, पाटोदा-18, शिरुर-19, वडवणी-23 अशी आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6,695 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यातील संक्रमित लोकांची संख्या वाढून 63,36,220 झाली आहे.तर त्या कालावधीत कोविड -19 च्या 120 रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यात या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत मृतांची संख्या 1,33,530 झाली आहे.

गेल्या 24 तासांदरम्यान, राज्यातील 36 पैकी सात जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही.अधिकाऱ्याने सांगितले की,याच काळात 7,120 रुग्णांना संसर्गमुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यासह, महाराष्ट्रात आतापर्यंत 61,24,278 रुग्ण बरे झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!