बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.7 अॉगस्ट – बीड (Beed) आज शनिवारी जिल्हा प्रशासनाकडे 4019 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 151 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3858 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांच्या संख्येत उतार दिसून आला आहे.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-51, अंबाजोगाई-6, आष्टी-34, धारुर-5, गेवराई-9, केज-11, माजलगाव-6, परळी-1, पाटोदा-13, शिरुर-4, वडवणी-11 अशी आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात शुक्रवारी ५ हजार ८५९ रुग्णांनी कोरोना वर मात केली. त्यामुळे राज्यात एकूण ६१ लाख ३० हजार १३७ कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे झाले आहे.
राज्यात एकूण ७४,४८३ ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत. दुसरीकडे राज्यात ५ हजार ५३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शुक्रवारी १८७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.