धारुर तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 100; मृत्यू दर चिंताजनक.

किल्लेधारूर दि.15 अॉगस्ट – धारुर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव (Corona outbreak)अधिक दिसून आला. तालुक्यात दि.14 अॉगस्ट पर्यंत तब्बल 100 जण कोरोनाने दगावली (Corona death) असून तालुक्याचा मृत्यू दर 2.21 आहे. दि.14 शनिवारी तालुक्यात 14 नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) भर पडली.
(100 corona victims in Dharur taluka; Mortality alarming.)
दिड वर्षापूर्वी जगभर थैमान घातलेल्या कोरोनाने देशातील ग्रामीण भागापर्यंत पाय पसरुन हैदोस मांडल्याचे चित्र दिसून आले. महाराष्ट्र सध्या दुसऱ्या लाटेतून सावरत असून शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आज स्वातंत्र्य दिनापासून बीड (Beed) जिल्ह्यातही निर्बंध (restrictions) शिथिल करण्याचे आदेश निघाले. मात्र अजूनही कोरोनाचा धोका कायम असून नागरिकांना कोरोना (Covid-19) नियम पाळण्याचे बंधन राहणार आहे.
धारुर तालुक्यात पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला. पहिल्या लाटेत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर बाधितांची आकडेवारीही कमी होती. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील तालुक्याची बाधितांची संख्या 4520 तर मृताची संख्या 100 झाली आहे. मृत्यूची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुपटीची असल्याचे दिसून येते. चालू आठवड्यात तालुक्यातील सोनिमोहा येथील व धारुर (Dharur) शहरातील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनूसार मिळालेली आकडेवारी.
एकुण बाधित-4520
मृत्यू संख्या-100
पॉझिटीव्हीटी रेट-12.68 टक्के
मृत्यू दर-2.21
एकुण तपासणी- 35649
RTPCR- 14018
Antigen- 21631
निगेटिव्ह – 31129
पॉझिटीव्ह – 4520
ॲक्टीव रुग्ण -63