क्राईम अलर्ट…. पैशाचा पाऊस पाडतो म्हणून भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार.

गंगापूर दि.17 अॉगस्ट – पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबाने 27 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना गंगापूर परिसरात घडली. पोलिसांनी (Police) भोंदूबाबासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह दोघांविरुद्ध बलात्कार, विनयभंग, महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Crime Alert …. Atrocities on women by Bhondubaba as it rains money.)
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील जामा मस्जिदजवळील पत्र्याच्या घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून कामिल शेख याने महिलेवर अत्याचार केला. डिसेंबर 2020 मध्ये कामिल याच्यासह पीडितेच्या पतीचे ओळखीचे स्टॅलीस्टींग फर्नांडिस व अशोक भुजबळ यांनी पीडित महिलेस पैशांचा पाऊस पाडू, असे आश्वासन दिले. त्यासाठी पूजा करावी लागेल, असे भोंदूबाबाने सांगून डिसेंबर 2020 मध्ये पीडित महिलेस तीन आठवडे दर बुधवारी येण्यास भाग पाडले.
यानंतर पूजा मांडून भोंदूबाबा कामिल याने पीडितेवर पुजा करण्याच्या बहाण्याने तीनवेळा बलात्कार केला. स्टॅलिस्टींग फर्नांडिस व अशोक भुजबळ यांनी महिलेस प्रवृत्त केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पैशांचा पाऊस पडेल, असे आश्वासन देत पीडितेस सात महिने आशेवर ठेवले होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात (Police station) तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भोंदूबाबा कामिल गुलाम यासीन शेख (29, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. गंगापूर गाव), स्टॅलीस्टींग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (58, रा. आंध्रप्रदेश, सध्या रा. कामठवाडा, नाशिक), अशोक नामदेव भुजबळ (63, रा. राधाकृष्णनगर, सातपूर, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.