बीड जिल्ह्यात 24 तासात 5 बळी; मृत्यू दर राज्यापेक्षा अधिक.

बीड दि.25 अॉगस्ट – बीड जिल्हयात कोरोना बाधितांचे आकडेवारी काहीशी कमी होत असताना कोरोना बळींचे प्रमाण मात्र अद्याप आटोक्यात आलेले नाही. गेल्या 24 तासात 5 कोरोना बळी गेले असल्याने आरोग्य विभागासमोर (Health Department) चिंतेचा प्रश्न बनला आहे.
(5 victims in 24 hours in Beed district; Mortality rate higher than state.)
मंगळवारी मागच्या 24 तासात तब्बल 5 कोरोना बळींची नोंद झाल्यामुळे बीड (Beed) जिल्हा आरोग्य विभागही हादरला आहे. देशभरात कोरोनाचा मृत्युदर कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र कोरोना बळींचे प्रमाण कमी होत नसल्याने आरोग्य विभागासमारचे आव्हान कायम आहे. सध्या महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.11 असताना बीडचा मृत्यू दर मात्र 2.68 इतका आहे.
मंगळवारी बीड जिल्ह्यात 24 तासातील पाच कोरोना बळींची नोंद झाली. यातील सर्वच साठीच्या पुढचे आहेत या पाच बळींमुळे जिल्हयातील कोरोना बळींचा (Corona death) एकूण आकडा 2 हजार 694 इतका झाला आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात 92 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले तर 83 रुग्णांना सुट्टी देण्यात आली.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 81 इतकी आहे. दरम्यान जिल्ह्यात म्यूकर मायकोसीसचे (Mucor mycosis) प्रमाण देखील कमी झाले असून केवळ 9 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर आत्तापर्यंत 154 रुग्णांनी म्यूकर मायकोसीसवर (mucormycosis) मात केली असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.