केजचे तीन कोरोना बळी… काय आहे आजची बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.29 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 4226 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 95 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4131 जण निगेटिव्ह आली आहेत. कालच्या अहवालात उतरलेली संख्या आज वाढली असल्याने जिल्ह्यात पुन्हा चिंता वाढली आहे.
(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-18, अंबाजोगाई-4, आष्टी-36, धारुर-5, गेवराई-4, केज-7, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-5, शिरुर-7, वडवणी-7 अशी आहे.
काल दि.28 शनिवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार दिवसभरात 103 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एका जुन्या मृत्यूसह 24 तासातील 4 मृत्यूंची नोंद झाली. 24 तासातील मृत्यूमध्ये 85 वर्षीय महिला होळ (ता.केज), 65 वर्षीय महिला सुरळेगाव (ता.केज), 75 वर्षीय पुरुष येवता (ता.केज) व 60 वर्षीय पुरुष महिंदवाडी (ता.अंबाजोगाई) यांचा समावेश आहे. आता, एकूण बाधितांची संख्या आता 1 लाख 963 झाली आहे. पैकी 97 हजार 205 कोरोनामुक्त झाले असून 2 हजार 707 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 51 रुग्ण उपचाराखाली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत.
दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची (Corona positive) संख्या 64 लाख 52 हजार 273 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.