कोरोंना विशेष

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 35 जणांचा मृत्यू; पहा कोणत्या जिल्ह्यातील किती?

मुंबई दि.5 सप्टेंबर – कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) घेतल्यानंतर राज्यभरात 35 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्यतज्ज्ञ डॉ. दिनेश सोळुंके यांनी माहिती अधिकार अधिनियमान्वये शासनाकडे याबाबत माहिती विचारली होती. सदरील मृतांची संख्या हि जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यानची आहे.

(35 die after corona vaccination in Maharashtra; See how many in which district?)

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या राज्यांतील 35 जणांचा मृत्यू (Corona death) झाल्याची माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे यात मुंबईकरांची संख्या निम्म्याहून अधिक आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर राज्यभरात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती आरोग्यतज्ज्ञ (Health expert) डॉ. दिनेश सोळुंके यांनी माहिती अधिकार अधिनियमान्वये शासनाकडे 9 मार्च 2021 ला मागितली होती.

राज्य कुटुंब कार्यालयातर्फे सदरील अर्जावर दि.2 सप्टेंबर 2021 म्हणजे तब्बल सहा महिन्यानंतर उपरोक्त माहिती देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 30 जणांनी पहिला, तर 5 जणांनी दुसरा डोस घेतला होता. मृतांमध्ये 50 वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 28 जणांनी कोविशिल्ड (Covishield), तर 7 जणांनी कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतली होती. लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांत मुंबईकरांची संख्या सर्वाधिक 18 इतकी आहे. त्यात 14 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. या रुग्णांना अन्य कोणते गंभीर स्वरूपाचे आजार होते का, याबाबत स्पष्टता यात दिलेली नाही.

जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान लस घेतलेल्या 4 हजार 288 जणांना त्रास झाला. त्यापैकी 4 हजार 197 लसवंतांना किरकोळ, 49 जणांना गंभीर, तर 43 नागरिकांना अतिगंभीर त्रासाला सामोरे जावे लागल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?
मुंबई – 18, ठाणे – 4, नागपूर – 3, पुणे – 2, लातूर – 2, सातारा – 1, रत्नागिरी – 1, औरंगाबाद – 1, बीड – 1, कोल्हापूर – 1, नाशिक – 1

कोरोनाबळींच्या आकडेवारीप्रमाणे लस घेतल्यामुळे मृत्यू झालेल्यांचा तपशीलही जाहीर करायला हवा. सदरची माहिती सुरुवातीच्या तीन महिन्यांचीच आहे. मे महिन्यात लसीकरणाने (vacccination) खऱ्या अर्थाने जोर घेतला आहे. या काळातील मृत्यूंचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!