करुणा शर्मा यांच्यावर परळीत गुन्हा दाखल; पहा काय म्हणाल्या करुणा शर्मा…

परळी दि.5 सप्टेंबर – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या संदर्भात धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा कट पोलिसांनी (Police) मोठ्या शिताफीने उधळून लावला असून, याप्रकरणी परळी पोलिसांनी पत्नी असल्याचा दावा करत सातत्याने बेछूट आरोप करणाऱ्या करूणा शर्मा या महिलेला पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. यामुळे, परळीसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
(Karuna Sharma charged in Parli; See what Karuna Sharma said …)
मागील दोन दिवसांपासून करूणा शर्मा फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमांतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत होत्या. आधीच्या व्हिडीओत त्यांनी अगामी निवडणुकीत पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. तसेच, वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार असून, त्यांनतर पत्रकार परिषद घेणार व मुंडेंच्या घरी जाणार असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळून आल्याने, हा मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा तर डाव नव्हता? असा संशय व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, ही वार्ता वाऱ्यासारखी परळी शहरात पसरल्यानंतर करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या अटकेसाठी आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ परळीतील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. आपण मुंडे यांची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा याआधी देखील अनेकदा प्रयत्न केला असून, आज थेट त्यांना संपवण्यासाठी डाव आखला गेला आहे, असा आरोप या महिलांनी केला. त्यामुळे, त्यांना अटक करण्याची जोरदार मागणी महिलांकडून केली जात होती.
दरम्यान, विशाखा रविकांत घाडगे रा. शिवाजीनगर, परळी यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद (complaint) दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी (Atrocity) कायद्याखाली करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का? : करुणा शर्मा
वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा शर्मा पोहोचल्या. मात्र, या ठिकाणी आमच्या साहेबांना बदनाम करायला आलात काय? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे यांनी माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये (Police station) बसवून ठेवले होते. यामुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले होते. मिळून आलेल्या पिस्तूल (Pistol) विषयी करुणा शर्मा यांनी ते माझे नसल्याचे सांगत त्यांनीच गाडीत ठेवल्याचे माध्यमांना सांगितले.