महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला सुरुवात; चार दिवसात लॉकडाऊन लावण्याचे मंत्री नितिन राऊत यांचे संकेत.

नागपूर दि.7 सप्टेंबर – गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन (lockdown) लावण्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे नागपूरवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे सावट दिसून येत आहे.
(Third wave begins in Maharashtra; Minister Nitin Raut hints at lockdown in four days.)
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आली. नागपुरातही कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री (Guardian Minister) नितीन राऊत यांनी दि.6 सोमवारी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या. बैठकी नंतर राऊत यांनी माध्यमां संवाद साधत लॉकडाऊन लावण्याचे सूतोवाच केलं.
तिसरी लाट आली
आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने (Third wave) आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध (restrictions) लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी (Chamber of Commerce) चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
विकेंड लॉकडाऊनची शक्यता
राऊत यांनी यावेळी विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) लावण्याची शक्यताही वर्तवली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेतही त्यांनी दिले. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.