बीड जिल्ह्यातील गुरुवारचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.16 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2982 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 59 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2923 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-16, अंबाजोगाई-2, आष्टी-18, धारुर-3, गेवराई-5, केज-2, माजलगाव-4, परळी-1, पाटोदा-5, शिरुर-0, वडवणी-3 अशी आहे.
राज्यात बाधितांची संख्या घटत असताना बीड जिल्ह्यात मात्र अद्याप धोका टळलेला नाही. आज कोरोना बाधितांची संख्येत घसरण झाली आहे. आज संशयित रुग्णांची तपासणी संख्याही वाढलेली आहे. काल दि.14 रोजी 61 दि.15 रोजी 68 तर आज 59 बाधित आढळून आली आहेत.
दरम्यान, राज्यात आज 3,783 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे.
राज्यात आज 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.