बीड जिल्हा कोरोना अपडेट … तपासणी संख्या 1418 ; पहा तालुका निहाय बाधित रुग्ण संख्या.

बीड दि.20 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1418 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 35 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 1383 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी असून काल बाधितांची संख्या 60 होती.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-6, अंबाजोगाई-3, आष्टी-16, धारुर-0, गेवराई-4, केज-2, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पन्नासच्या आत आलेली कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे काल दिसून आले. सण, उत्सवाचा काळ कोरोना प्रादुर्भाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कालच गणेशोत्सवाची सांगता झाली. गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने केवळ 1418 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी झाली. यामुळे आज बाधितांची संख्या पुन्हा पन्नासच्या आत आली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात रविवारी 3,413 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 36 हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.16 टक्के आहे. राज्यात रविवारी 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 720 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 42 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!