कोरोंना विशेष

सावधान… लॉकडाऊन रिटर्न… महाराष्ट्रातील तब्बल 61 गावांत लॉकडाऊन.

अहमदनगर दि.4 अॉक्टोंबर – राज्याचा पॉझिटीव्हीटी रेट उतरत असताना अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील मात्र कोरोनाचा उद्रेक समोर आला आहे. पॉझिटीव्हीटी दर (Positivity rate) पाच पेक्षा जास्त झाल्याने 61 गावात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन (lockdown) लावण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

(Caution … Lockdown returns … Lockdown in 61 villages in Maharashtra.)

गणेशोत्सव व सणसुदीनंतर कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचा धोका व्यक्त केला जात होता. महाराष्ट्रात सुदैवाने रुग्ण संख्या वाढल्याचे आढळून आली नाही. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोना बाधित (Corona positive) रुग्ण आढळून आली आहेत. या गावांमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक 24 गावे ही संगमनेर तालुक्यातील आहेत. लॉकडाऊन बाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी जारी केला.

जिल्ह्यातील सध्याची दैनंदिन रुग्णसंख्या ही 500 ते 800 च्या दरम्यान आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्या गावात 20 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत, अशा गावांमध्ये कन्टेनमेंट झोन (Containment zone) जाहीर करणे, गावबंदी करणे, कोरोना नियमांचे पालन करणे, शंभर टक्के लसीकरण (vacccination) करणे आवश्यक होते. याबाबत गावातील संबंधित भागात निर्बंध (restrictions) लागू करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी कुठेच झाली नसल्याचे आढळून आले.

असे आहेत निर्बंध
4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत 61 गावांमधील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आहेत, असे भाग कन्टेनमेंट झोन करणार. गावात कोणालाही येण्यास व जाण्यास प्रतिबंध. अत्यावश्यक सेवा (essential services) वगळता सर्व दुकाने, वस्तू, विक्री, सेवा बंद. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई. कृषी माल वगळता इतर वाहनांना गावात बंदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!