बीड जिल्ह्यात 2 मृत्यू; नवीन कोरोना बाधितात मोठी वाढ; पहा काय आहे तालुका निहाय स्थिती.

बीड दि.8 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज गुरुवारी 1706 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 38 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1668 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी 4 तर गुरुवारी 2 मृत्यूची नोंद झाली आहे.
(Deaths increased in Beed district; But a large decline in new corona bites; See what is the taluka wise situation.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-7, आष्टी-13, धारुर-1, गेवराई-0, केज-3, माजलगाव-4, परळी-2, पाटोदा-3, शिरुर-2, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि.6) जिल्ह्यात कोरोना उपचार घेत असलेल्या चौघांनी तर गुरुवारी (दि.7) दोघांनी आपला जीव गमावला आहे. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2780 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी 2 हजार 876 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 763 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज घडीला 33 हजार 181 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात 90 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 362 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात आजवर 5 कोटी 96 लाख 19 हजार 637 चाचण्या पार पडल्या आहेत. सध्या राज्यात 1 हजार 416 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2 लाख 39 हजार 760 जण होम क्वारंटाईन आहेत.