कोरोंना विशेष

कोरोना लस न घेणाऱ्यांना सरकारचा झटका; लसीकरणाला गती देण्यासाठी मोठा निर्णय.

नवी दिल्ली दि.9 अॉक्टोंबर – सरकारकडून वारंवार लस ( Corona vaccine) घेण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. पण अजूनही असे काही नागरिक आहेत जे सरकारच्या सूचनांकडे (guidelines) कानाडोळा करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसेल ते हजर असूनही गैरहजर ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान महाराष्ट्र सरकारनेही “मिशन कवच कुंडल” राबवण्यास सुरुवात केली आहे.

(Government crackdown on non-corona vaccine; Big decision to speed up vaccination.)

कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी दिल्ली सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेले कर्मचारी आता ऑन लिव्ह मानले जाणार आहेत. म्हणजेच कर्मचारी हजर असतील तरी त्यांची हजेरी आणि काम दोन्ही गृहित धरलं जाणार नाही. ज्यांनी अजूनही लस घेतली नाही त्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत लसीचा किमान पहिला डोस घेण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

दिल्ली सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसह निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांत सर्व सरकारी कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयांचे शिक्षक, शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना लसीचा किमान पहिला डोस घेण्यासाठी 15 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम (Ultimatum) देण्यात आला आहे.

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही त्यांना गैरहजर ठरवलं जाणार आहे. त्यांच्या नावावर रजा शिल्लक जरी असली तरी त्यांना ऑन लिव्ह (On leave) समजलं जाणार आहे. आणि रजा शिल्लक नसतील तर गैरहजर समजून पगार देखील कापला जाईल, असं दिल्ली सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारचे “मिशन कवच कुंडल”
महाराष्ट्र सरकारनेही राज्यात “मिशन कवच कुंडल” योजना आखली आहे. कोरोना संसर्गावर (Corona infection) संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी “मिशन कवच कुंडल”ची अंमलबजावणी प्रशासनाने दि.8 सुरूवात केली असून जिल्ह्यातील लसीकरण झाले नाही अशा सगळ्यांना या मोहिमेत लस दिली जाणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही मोहिम 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत राबविली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात कवच कुंडल मिशन अंतर्गत कोरोना लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येणार असून सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी, खाजगी व्यवसाय आणि उद्योगामधील व्यक्ती, दुकाने आणि व्यावसायिक यांना प्राधान्याने लसीकरण (vacccination) करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!