बीड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; आज 2 कोरोना बळी; पहा आजचे कोरोना अपडेट.

बीड दि.20 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 985 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 6 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 979 जण निगेटिव्ह आली आहेत. आज कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट आढळून आली असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल दिसत आहे. आज 2 कोरोना बळी नोंदवण्यात आले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-3, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना (Corona) हद्दपार होत असल्याचे चित्र दिसत आहे. काल अचानक संख्येत मोठी वाढ दिसून आली होती. आज मृत्यूच्या संख्येत 2 ने वाढ झाली आहे. तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2799 झाली आहे. आज पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 151 ॲक्टीव रुग्ण आहेत. आज 3 तालुक्यात केवळ 6 कोरोना बाधित आढळून आली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात आज दिवसभरात 1,638 कोरोना संक्रमितांची (Corona Positive) नोंद झाली. 2,791 जण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. 49 जणांचा मृत्यू झाला.

राज्यात एकूण सक्रीय असलेली रुग्णसंख्या 26,805 इतकी आहे. राज्यात आजवर झालेल्या कोरोना संक्रमितांची संख्या 65,94,820 इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!