कोरोना चाचण्यात मोठी वाढ, दोन मृत्यू; पहा बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट.

बीड दि.27 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज तब्बल 1366 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 14 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1352 जण निगेटिव्ह आली आहेत. काल 594 चाचण्या होत्या, आज यात मोठी वाढ दिसून आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून थांबलेले मृत्यू सत्र सुरु होत दोन मृत्यूची नोंद झाली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-2, आष्टी-6, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) दहाच्या आत असलेली संख्या 14 वर गेली आहे. काल मृत्यू संख्येत 2 ने वाढ झाली आहे. काल 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूची एकुण संख्या 2802 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 133 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी सोमवारपेक्षा 312 अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मंगळवारी 1 हजार 201 नवे रुग्ण वाढले असून, सोमवारी ही संख्या 889 होती. आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 66 लाख 05 हजार 051 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 38 हजार 395 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 22 हजार 981 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आज 32 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 40 हजार 060 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 20 लाख 80 हजार 203 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 961 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 76 हजार 191 जण होम क्वारंटाईन आहेत.