धारुरसह जिल्ह्याची एसटी बससेवा ठप्प; ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल.

किल्लेधारूर दि.28 अॉक्टोंबर – एसटी महामंडळाचे (ST corporation) शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या समर्थनार्थ पुकारलेल्या संपात धारुरसह बीड (Beed) जिल्ह्यातील सर्व आगारानी सहभाग घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प पडली असून ऐन दिवाळीच्या (Dipawali) तोंडावर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

(District ST bus service with Dharur closed; The plight of passengers on the eve of Ain Diwali.)

संयुक्त कृती समितीच्या या उपोषणात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी धारुर (Dharur) आगार व बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहरातून होणारी बस सेवा ठप्प झाली आहे. धारुर येथील आगाराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र जमले आहेत. आगारातून एकही बस (Bus) बाहेर पडणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आगारातील 278 पैकी आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षक वगळून सर्वच कर्मचारी संपावर असल्याची माहिती धारुर आगारातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय सोनटक्के यांनी दिली.

बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
बीड जिल्ह्यात 8 एसटी आगार (Depot) आहेत. आजपासून या आठही आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणात दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यामुळे परिवहन सेवा ठप्प झाली आहे. बस सेवा ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (passengers) नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस सेवा बंद असल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

काय आहे कृती समितीची भुमिका
समितीच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे तीन टप्प्यात आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दिवाळीच्या तोंडावर आजपासून उपोषण सुरू करण्यात येत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!