बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट; आज तीन तालुक्यात आढळले रुग्ण, पहा तालुका निहाय संख्या.

बीड दि.29 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 984 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 8 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 976 जण निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ तीन तालुक्यातच पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत तर इतर तालुके शुन्यावर आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-0, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या बुधवारी 14 गुरुवारी 10 तर आज 8 वर आली आहे. काल 1 जणाचा मृत्यू तर 8 जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2803 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 133 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात 1418 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 36 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 2112 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 45 हजार 454 कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 54 टक्के इतके झाले आहे.