चोरट्यांचा पाठलाग करताना हृदय विकाराचा झटका; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे निधन.

लातूर दि.8 नोव्हेंबर – लातूरमध्ये रात्रीच्या गस्ती दरम्यान घरफोडी करीत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे लातूर (Latur) येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण यांचे हृदय विकाराच्या (Heart attack) झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.8 सोमवारी पहाटे घडली.

(Heart attack while chasing thieves; Assistant Police Sub-Inspector passes away.)

सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी कॉलनी परिसरात एका घरात चोर शिरले. दार तोडल्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी पोलिसांना (Police) फोन केला. घटनास्थळी लगेच एलसीबीची (LCB) गाडी पोहचली. तिघे चोरटे होते ते मागच्या बाजूने पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद खान पठाण (वय 56) पाठलाग करताना खाली कोसळले. त्यांना तात्काळ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरकडून त्यांना मृत घोषीत करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी आणि रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) निखील पिंगळे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे अहमदखान पठाण यांचे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच अहमदखान पठाण यांना शोक सलामी देण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) गजानन भातलवंडे, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख व पोलीस अमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!