बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; परळीत वाढ… पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी .

बीड दि.19 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 769 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 13 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 756 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सहा तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसात आढळलेल्या अधिक रुग्ण संख्येमुळे ॲक्टीव रुग्ण वाढले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-1, आष्टी-3, धारुर-1, गेवराई-1, केज-0, माजलगाव-0, परळी-4, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या तीन दिवसात वाढलेली दिसत आहे. मंगळवारी 12, बुधवारी 11, गुरुवारी 17 तर आज 13 रुग्ण आढळून आली आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार गुरुवारी 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2818 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 71 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 963 नव्या कोरोना रूग्णांचं (Corona Positive) निदान झालं आहे. तर 24 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा मृत्यूदर कमी झालेला नाही.
गुरुवारी दिवसभरात राज्यात 972 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 71 हजार 763 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.