धारुर घाट रुंदीकरण प्रकरणी काय म्हणाले नितिन गडकरी ?

किल्लेधारूर दि.26 नोव्हेंबर – केंद्रीय रस्ते वाहतुक विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना किल्ले धारुर तेलगाव रस्त्यावरील घाट (Dharur Ghat) रुंदीच्या महत्त्वाच्या प्रश्नासह इतर रस्ते विकासासाठी गुरुवारी लातूर (Latur) येथे भेटलेल्या शिष्टमंडळास गडकरी यांनी सकरात्मक प्रतिसाद देत तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले.

(What did Nitin Gadkari say about Dharur Ghat widening case?)

लातूर येथे केंद्रीय रस्ते वाहतुक विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्त्यांचा भुमिपूजन व विकास कामांचे उद्घाटन दि.25 गुरुवारी करण्यात आले. गुरुवारी रात्री ना. गडकरी यांची भेट घेण्यासाठी धारुरचे (Dharur) शिष्टमंडळ लातूर येथे आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचे स्वियसहाय्यक ओमप्रकाश शेटे व औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी ना. गडकरी यांची रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृहात भेट घडवून दिली.

यावेळी शिष्टमंडळाने धारुर माजलगाव रस्ता (राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र 548 सी) वरील घाट रुंदीकरण, लोंखडी सावरगाव ते पाडळसिंगी रस्ता व आरणवाडी साठवण तलावाजवळ सुरक्षा भिंतीचे संरक्षक कठडे करण्याबाबत गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. याप्रसंगी ना. गडकरी यांनी निवेदन स्विकारत निवेदनावर तातडीने निर्णय घेण्याचा शेरा देत सकरात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी शिष्टमंडळाचे म्हणने एकून आपल्या सुचनेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन ना. नितिन गडकरी यांनी दिले. यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शाकेर सय्यद (Sayyad Shaker) , जलदुत विजय शिनगारे, आडत व्यापारी संदिप शिनगारे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!