बीड कोरोना अपडेट; सहा तालुक्यात वाढले रुग्ण, पहा तालुकानिहाय स्थिती.

बीड दि.1 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 798 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 10 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 788 जण निगेटिव्ह आहेत. दोन दिवसानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-2 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग दुसऱ्या वाढ दिसून आली आहे. सोमवारी 2 व मंगळवारी 7 वर असलेली बाधितांची संख्या बुधवारी 10 वर आली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूची एकुण संख्या 2828 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 66 आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी 678 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून, 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या 7 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मंगळवारी 35 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 35 हजार 658 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 83 हजार 435 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!