बीड कोरोना अपडेट; चौथ्या दिवशी वाढ, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.8 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1602 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 11 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1591 जण निगेटिव्ह आहेत. कोरोना बाधितांची संख्या आज चौथ्या दिवशी चाचण्यांत वाढ झाल्यामुळे बाधितांची सख्येतही वाढ दिसून आली.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-0, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-3, माजलगाव-1, परळी-2, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-5 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस घट दिसत असताना आज अचानक वाढ दिसून आली. वडवणी व केज तालुक्यात बाधित वाढले आहेत. मंगळवारी (दि.6) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत दोनने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2833 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 52 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात राज्यात 699 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 1,087 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असून, सध्या राज्यात 6 हजार 445 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 66 लाख 39 हजार 995 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 88 हजार 880 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.