बीड कोरोना अपडेट; वडवणीत रुग्ण संख्या वाढली,पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.10 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1285 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 23 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1262 जण निगेटिव्ह आहेत. कोरोना संशयितांच्या चाचण्यांत वाढ करण्यात आली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-16 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज मोठी वाढ दिसून आली. एकट्या वडवणी तालुक्यात 16 बाधित आढळली. गुरुवारी (दि.9) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2833 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 56 झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात राज्यात 789 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 585 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 6 हजार 482 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी राज्यात 7 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 66 लाख 41 हजार 667 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 90 हजार 305 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!