बीड जिल्ह्यात भिषण अपघात; दोन सख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओने चिरडले.

बीड दि.20 डिसेंबर – बीडच्या (Beed) पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रात्री 8 च्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने दोन सख्या बहिणींना चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(Terrible accident in Beed district; Two sisters were crushed by Bhardhav Scorpio.)

जेवण करून घराबाहेर उभे असलेल्या दोन सख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओने (Scorpio) चिरडले आहे. यात दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, जामखेड – पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात हा थरार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. रोहिणी महारुद्र गाडेकर आणि मोहिनी महारुद्र गाडेकर असं मृत बहिणींचे नावं आहेत.

या भिषण अपघातातील (Terrible accident) मयत मोहिनी ही डी फार्मसी चे शिक्षण घेत होती. स्कॉर्पिओने या दोघी बहिणीसह आणखीन दोघांना चिरडले असून ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर पाटोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक फरार झाला आहे.

अपघात (accident) घडताच नातेवाईक व परिसरातील नागरीकांनी मदत व बचाव कार्य केले. या प्रकरणी पाटोदा पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गाडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!