बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय स्थिती….

बीड दि.4 जानेवारी – जिल्ह्यात दिलासादायक चित्र असताना आज रुग्ण संख्या वाढलीआहे. आज बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे 1273 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 10 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1063 जण निगेटिव्ह आहेत. आज 5 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. राज्यात मात्र ओमायक्रॉनसह कोरानाचा विस्फोट झाला आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-4, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-1, केज-2, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत गेल्या दोन दिवसात मोठी घट झाली होती. आज मंगळवारी (दि.4) मात्र 10 कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 होती. सोवारी मृत्यू संख्येत एकाने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2841 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 39 झाली आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पहायला मिळत आहे. आज दिवसभरात 12,160 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर यांपैकी 68 रुग्ण ओमिक्रॉनचे (Omicron) संसर्ग बाधित आहेत.

राज्यात एकूण ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 578 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज 1,748 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (recovery rate) 97.05 टक्के झालं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!