बीड कोरोना अपडेट… जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट वाढला; पहा तालुकानिहाय स्थिती….

बीड दि.9 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1410 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 32 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1378 जण निगेटिव्ह आहेत. आज 8 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-16, अंबाजोगाई-2, आष्टी-0, धारुर-2, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-4, पाटोदा-1, शिरुर-4, वडवणी-2 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज पुन्हा मोठी वाढ झाली आहे. काल शनिवारी (दि.8) 26 कोरोना बाधित आढळून आले होते ती वाढून आज 32 झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार काल 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2842 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 93 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 0.5 वरुन 1.5 झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 41 हजार 434 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यात आजपासून कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 424 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापुर्वी शुक्रवारी 1 लाख 41 हजार 986 रुग्ण आढळले होते. तर गुरुवारी 1 लाख 17 हजार 100 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात आतापर्यंत 3.55 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3.44 कोटी जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील विविध भागात सध्या 5 लाख 84 हजार 580 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!