धारुर तालुक्यात 15 वर्षीय मुलीवर 46 वर्षीय नराधमाकडून अत्याचार; पोलिसांत गुन्हा.

किल्लेधारूर दि.13 नोव्हेंबर – धारुर तालुक्यात 15 वर्षीय मुलीवर 46 वर्षीय नराधमाकडून अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीवर धारूर पोलिसात बलात्कार (Rape) व पोस्को (Pocso) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास धारुर पोलीस करत आहेत.
याबाबत फिर्यादीवरुन सविस्तर माहिती अशी की दि. 12 नोव्हेंबर शनिवार रोजी धारूर (Dharur) तालुक्यातील गावंदरा येथे दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान पिडित अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोरील दारामध्ये बसलेली असताना आरोपी नराधम पीडित मुलीच्या घरासमोर आला. यावेळी शिवीगाळ करत स्वतःच्या घरी पीडित मुलीला ओढत नेऊन संबंधित अल्पवयीन पीडितेवर (Minor girl) अत्याचार (Rape) केला. या घटने संदर्भात कोणाला माहिती दिली तर फाशी देऊन मारून टाकेल अशी धमकी आरोपीने दिली. यानंतर पीडित मुलगी तिच्या घरी गेली व ऊस तोडणीला गेलेल्या आपल्या आई-वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीच्या आई वडीलांनी धारुर पोलीस स्टेशनमध्ये (Dharur Police Station) धाव घेतली. आरोपी अर्जुन मारुती बडे याच्या विरोधात धारुर पोलिसात 376 ,504, 506, 34 पोक्सो (POCSO) 4,8,12,324 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक (PSI) घोडे करत आहेत.
( A 15-year-old girl was raped by a 46-year-old man in Dharur taluka; A crime in the police. )