बीड कोरोना अपडेट… बीडमध्ये बाधित वाढले; पहा तालुकानिहाय स्थिती….

बीड दि.7 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1776 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 16 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1760 जण निगेटिव्ह आहेत. आज 6 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यासह देशात पुन्हा कोरानाचा विस्फोट झाला आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-3, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-3, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग चौथ्या दिवशीही मोठी वाढ झाली आहे. काल गुरुवारी (दि.6) 12 कोरोना बाधित आढळून आले होते ती वाढून आज 16 झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2841 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 67 झाली आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत चालली आहे. नव्या वर्षात कोरोना पुन्हा त्रास देत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. आजही राज्यात कालच्या तुलनेत जास्त रुग्ण सापडले आहेत.

रुग्णांची ही वाढती आकडेवारी निश्चितच काळजीत टाकणारी आहे. राज्यात आज दिवसभरात ३६ हजारांहून अधिक तर राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!