दरोडेखोरांचा धुमाकूळ… एकाच रात्री टाकला दोन ठिकाणी दरोडा; तिसरा प्रयत्न फसला.

बीड दि.9 डिसेंबर – बीड (Beed) जिल्ह्यातील नेकनूर परिसरात दरोडेखोरांनी मध्यरात्री धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडा (Robbery) टाकला. तर एक प्रयत्न सतर्क झालेल्या नागरीकांनी हाणून पाडला. दरोडेखोर धुमाकूळ घालून पसार झाले असून पोलिस दरोडेखोरांच्या शोधात आहेत.

(A swarm of robbers … robbed two places in one night; The third attempt failed.)

तर तिसऱ्या ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या ठिकाणी जेव्हा दरोडेखोरांनी (robbers) दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिसरातील नागरीक सतर्क झाले. त्यामुळे त्यांना तिथून धूम ठोकावी लागली. मात्र त्यावेळी दरोडेखोरांनी अंधाधूद दगडफेक (Stone Pelting) केली.

या घटनेमुळे परिसरातील नारिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरोडेखोरांकडे शस्त्र होती. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत दोन जणांना लुबाडलं. यावेळी त्यांनी तीन जणांना प्रचंड मारहाणही केली. आरोपींनी पीडित नागरिकांचे सोने-चांदीचे ऐवज लंपास केले आहेत. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात (Police Station) अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुलतानपुर येथील अशोक दगडू नाईकवाडे यांना दरोडेखोरांनी गजाने मारहाण केली. या मारहाणीत नाईकवाडे यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. दरोडेखोरांनी त्यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने पळवून नेले. सफेपूरचे रामभाऊ किसन घोडके, गोरख रामभाऊ घोडके या दोघांना मारहाण करत त्यांच्या जवळील 7 ग्रॅम सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले.

नेकनूर येथे माजी सरपंच शेख आझम पाशा, पांडुरंग होमकर यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. आजूबाजूच्या लोकं सतर्क होवून पोलिसांना माहिती दिली. यामुळे चोरट्यांनी धुम ठोकली. मात्र यावेळी दरोडेखोरांनी घरांवर दगडफेक केली.

दुसऱ्यादिवशी पहाटे दरोडेखोरांनी मध्यरात्री प्रचंड धुमाकूळ घातल्याचं समोर आलं. कारण ज्या ठिकाणी दरोडेखोरांनी हैदोस घातला होता त्या दोन्ही ठिकाणचे पीडित नागरीक नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आले. त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसाना सांगितला. त्यानंतर पोलिसांना सर्व प्रकार समजला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस (Police) आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत भीतीचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!