मुख्याध्यापकावर अपहाराचा गुन्हा दाखल ;
शिक्षण विभागात खळबळ.

किल्लेधारूर दि.25 मार्च- धारुर (Dharur) तालुक्यातील अंजनडोह केंद्राचे तत्कालीन मुख्यध्यापक रमेश विष्णूपंत नखाते यांनी शिक्षकांच्या एलआयसी (Life insurance corp. LIC) इन्कम टॅक्स (Income Tax) व इतर कपातीची रक्कमच गायब केल्या प्रकरणी शिक्षकांच्या तक्रारी वरून धारुर पोलिसांत (Dharur Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
( A case of embezzlement has been filed against the principal; Excitement in the education department. )
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या माजलगाव तालुक्यातील शिंदे वस्ती तांड्यावर कार्यरत असणारे सहशिक्षक रमेश नखाते हे मागच्या काही महिन्यापासून चर्चेत आहेत. त्यांनी धारूर (Dharur) तालुक्यात अंजनडोह येथे प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापक असताना शिक्षकांच्या एलआयसी (Life insurance corp. LIC) तसेच वेगवेगळ्या विमा पॉलिसी, आयकर, पतसंस्थेच्या कपाती यावर 26 लाख 47 हजार रुपयांचा अपहार केला होता. सदरील प्रकार हा मागील तीन वर्षा पूर्वी उघडकीस आला होता. या प्रकाराला शिक्षण विभाग कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत होत. परंतु सदरील प्रकाराकडे येथील शिक्षकांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेत रमेश नखाते यांना तडका फडकी निलंबित करण्यात आले होते. यानंतर काही कालावधी उलटल्या नंतर नखाते यांना माजलगाव तालुक्यातील शिंदे वस्ती येथील तांड्यावरच्या एका शाळेवर सहशिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली होती. तरीही सदरील शिक्षका कडून अपहार केलेली रक्कम भरण्यात आली नव्हती.
या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू होती. यात पाच लाख ऐंशी हजार रुपयांची रक्कम भरण्यात आली होती. उर्वरित 20 लाख 67 हजार रुपये रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मुदत देऊन ही नखाते यांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ केली असल्याने संबंधित शिक्षकांच्या नखाते हे पैसे भरत नसल्याचे लक्षात आल्या नंतर शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. यावरून आयुक्तांनी तात्काळ कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. 13 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. यावेळी रमेश नखाते गैरहजर राहिले होते. आपल्याकडे आलेल्या 40 शिक्षकांना न्याय द्यावा म्हणून भ्रष्टाचार करणाऱ्या रमेश नाखाते वर तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आदेश शिक्षण विभागाला देण्यात आली होती. त्यावरून येथील गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्या फिर्यादी वरून धारूर पोलीस (Dharur Police) ठाण्यात 24 मार्च रोजी शिक्षकांच्या पगारात अपहार करणाऱ्या रमेश नखाते याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.