धारुर पोलिस हद्दीत दरोड्याचा गुन्हा नोंद; चटणीची पूड टाकून लोखंडी गज आणि कोयत्याने हल्ला.

किल्ले धारूर दि.29 एप्रिल – बीड (Beed) जिल्ह्यातील धारुर (Dharur) पोलिस हद्दीतील उमराई येथे चटणीची पूड टाकून लोखंडी गज आणि कोयत्याने हल्ला करत घरातील 2 लाख 73 हजार रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी धारुर पोलिसांत (Police) बारा जणां विरुध्द दरोड्याचा (robbery) गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या काही दिवसांत धारुर पोलिस हद्दीत गंभीर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपुर्वी एका आडत व्यापाऱ्यास लुटण्याच्या उद्देशातून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना व थेटेगव्हाण येथे जमीनीच्या वादातून झालेला हिंदू मुस्लिम वादातून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या पाठोपाठ आता दरोड्याची ही घटना 22 एप्रिल रोजी घडल्याचे समोर आले आहे. या दरोड्यातील जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी 12 दरोडेखोरांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण भीमराव केंद्रे (वय 22 वर्ष) रा. उमराई ता.अंबाजोगाई हे घराच्या दारात झोपले असताना अचानक 12 जण घरात घुसले. यावेळी सगळ्यांकडे लोखंडी रॉड, पाईप, गज, लाकडी दांडा, कोयता आणि गाडीची चैन अशी हत्यारं होती. या मारेकऱ्यांनी लक्ष्मण यांच्या घरात घुसून अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.
‘तुझा भाऊ हा नितीन केंद्रे यांच्यासोबत पोलीस स्टेशनला का गेला?’ असा सवाल करत त्यांनी लक्ष्मण केंद्रे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याचा उद्देशाने यातील हत्याराने 12 जणांनी लक्ष्मण यांच्या हातावर, पोटावर, पाठीवर, खांद्यावर, मांड्यावर सपासप वार केले. लक्ष्मण केंद्रे हे गंभीर जखमी झालेले असतानाच अनिल किसन केंद्रे याने घरात घुसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच जीवे मारून टाका असं म्हणून चटणीची पूड लक्ष्मण यांच्या डोळ्यात टाकली.
दरम्यान, यावेळी लक्ष्मण यांनी प्रचंड आरडाओरडा केला. त्यामुळे लक्ष्मणची आई, बहीण व चुलत भाऊ हे त्यांना सोडवण्यासाठी गेले. पण या सगळ्यांना देखील आरोपींनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी आरोपींनी घरात सिमेंट रोडच्या कामांसाठी लोखंडी कपाटात जमवून ठेवलेले 2 लाख 73 हजार रुपये जबरीने चोरूनही नेले.
याप्रकरणी लक्ष्मण भीमराव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून नामदेव दगडोबा केंद्रे, बाळासाहेब शिवाजी केंद्रे, निवृत्ती शिवाजी केंद्रे, भागवत आश्रुबा केंद्रे, गोविंद आश्रुबा केंद्रे, राहुल बाळासाहेब केंद्रे, अशोक नामदेव केंद्रे, कांतीलाल निवृत्ती केंद्रे, अभिषेक अशोक केंद्रे, ज्ञानेश्वर बंडू केंद्रे, दिगंबर दत्तू केंद्रे आणि अनिल किसन केंद्रे सर्व राहणार उमराई ता. अंबाजोगाई यांच्या विरोधात तक्रार (Complaint) दाखल करण्यात आली. या तक्रारीवरुन धारूर पोलीस ठाण्यात कलम 143, 147, 148, 149, 307, 326, 324, 323, 452, 505, 506 भादंवि सह गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) घोडे करत आहेत.
( A case of robbery was registered at Dharur police station; Attack with an iron yard and a scythe with chutney powder. )