राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख प्रकरणाला वेगळे वळण; भाजप नेत्या चित्रा वाघ व आ. सुरेश धस अडचणीत.

बीड दि.19 जुन – बीड येथील राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात भाजप नेत्यांच्या दबावामुळे बलात्काराची तक्रार दिल्याची कबुली तक्रारदार महिलेने दिली. या कबुली जबाबामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून याप्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ व आमदार सुरेश धस (MLC Suresh Dhas) अडचणीत सापडले आहेत.

गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील तरुणीने बलात्काराचा आरोप करुन पोलिसांत तक्रार दिली होती. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत महेबूब शेख यांनी नार्को टेस्टची (Narco test) तयारी ठेवून आरोप फेटाळून लावले होते. याप्रकरणाला आता पुन्हा तक्रारदार महिलेने केलेल्या खुलास्यावरुन वेगळे वळण मिळाले असून सदर प्रकरण म्हणजे भाजप नेत्यांनी रचलेले षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारदार महिलेने, भाजप नेत्या (BJP Leader) चित्रा वाघ तसेच आ. सुरेश धस यांनी दबाव आणल्यामुळेच आपण ही तक्रार दिली, असे म्हटले आहे. उलट मालेगावचा माजी नगरसेवक नदीम यानेच आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार त्या महिलेने पोलिसांकडे केली आहे. औरंगाबाद शहरातील जिन्सी भागामधील नागसेन कॉलनीतील तीस वर्षीय महिलेने या प्रकरणाचा भांडाफोड केला.

नदीम याने पहिल्यांदा मेहबूब शेखवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. 19 डिसेंबर 2020 रोजी पहिल्यांदा नाशिक पोलीस ठाण्यात आणि 26 डिसेंबर 2020 रोजी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अशी माहिती तक्रारदार महिलेने दिली आहे.
नदीमने महिलेस 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी आष्टी येथील हॉटेल कृष्णामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्याशी ओळख करून दिली. नंतर नदीमने महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी महिलेने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना देखील नदीमने मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे सांगितले. मात्र चित्रा वाघ यांनी एफआयआरप्रमाणेच तुला सांगावे लागेल, नाही तर तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल असे सांगितल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे.

( A different twist to the NCP’s Mehboob Sheikh case; BJP leader Chitra Wagh and MLC Dhas in trouble. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!