वडवणीत फर्नीचर दुकानाला भिषण आग; 40 लाखांचे नुकसान… जयसिंग सोळंकेची दमदार कामगिरी.

वडवणी दि.27 डिसेंबर – वडवणी (Wadwani) शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकातील बालाजी फर्निचर आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स स्टील सेंटर च्या दोन मजली शोरुमला सोमवार दि.27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. आगीत मदतकार्य करण्यासाठी जि.प. बांधकाम सभापती जयसिंग सोळंके (Jaising Solanke) यांनी जीव धोक्यात घालून धावून गेल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

(A fierce fire at a furniture store in Wadwani; Loss of 40 lakhs … Jaysingh Solanke’s strong performance.)

या आगीत दोन मजली शोरूम जळून खाक झाले आहे. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला (Fire Brigade) यश आले. या आगीमध्ये 40 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शोरूमचे मालक विजय राजेभाऊ मायकर यांनी दिली आहे.

शहरातील बालाजी फर्निचर या दुकानाला आज चार वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे (Short circuit) भीषण आग लागली. वडवणी नगरपंचायतची अग्निशमन गाडी नादुरुस्त असल्याने आगीत दोन मजली दुकानाची राख होताना नागरिक आणि दुकान मालक हतबलतेने पाहत होते. या आगीत फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळल्याने अंदाजे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुख्य रस्त्यावरील विजय मायकर यांच्या मालकीचे बालाजी फर्निचर हे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी दुकानाला मोठ्या उत्साहात सुरुवात केली होती. दुकानात खालच्या मजल्यावर फर्निचर तर वरच्या मजल्यावर इलेक्ट्रोनिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली.

क्षणार्धात आगीने वरचा मजला कवेत घेतला. आग पसरत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी खालच्या मजल्यावरील सामान बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, वरच्या मजल्यावरील फ्रीजला आग लागल्याने त्यातील गॅसचा स्फोट झाला. यामुळे आग झपाट्याने पसरली. एकाबाजूने दवाखाना तर दुसऱ्या बाजूने कपड्याचे दुकान असल्याने नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले.

मात्र, आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने नागरिकांचे प्रयत्न तोकडे पडत होते. त्यातच शहरात अग्निशमन दलच उपलब्ध नसल्याने नागरिक हतबल झाले. तब्बल दोन तास आगीचे तांडव सुरु होते. वेळीच आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण दुकानाची राख झाली.या आगीमध्ये परिचर्चा शोरूम मधील फ्रीज, कपाट, फॅन, सोफासेट कुलर, गादी, लाकडी पलंग, खुर्ची, टि.व्ही, डिश दिवान, देवघर, लाईट फिटींग चे सामान इत्यादी वस्तुंची अक्षरशः राख झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!