माझं गाव

धारुर घाटात अपघात ; दोन जण गंभीर जखमी.

किल्लेधारूर दि.20 जून – धारूर घाटात (Dharur Ghat) आज रविवारी पहाटे खताची पोते घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात (Accident) ट्रक ड्रायव्हर व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. घाटात अपघात होण्याची शृंखला सुरुच असून पुन्हा घाट रुंदीकरणाचा (Ghat widening) प्रश्न चर्चेत आला आहे.

(Accident in Dharur Ghat; Two were seriously injured.)

रविवारी दि.20 जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास उस्मानाबादहुन माजलगावकडे खताचे पोते घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 25 यू. 0301 घाटातील अरुंद रस्त्यामुळे एका अवघड वळणावर पलटी झाला. दररोज अपघात (Accident) होण्याच्या घटना घडत असून रोजच्या अपघातामुळे या घाटात वाहनधारकात मात्र भिती निर्माण होत आहे.

धारूर येथील घाटामध्ये (Dharur Ghat) अरूंद रस्त्यामुळे दररोज अपघात होण्याची मालिका सुरू आहे. उस्मानाबादहुन माजलगाव कडे खताचे पोते घेऊन जाणारा ट्रक अवघड वळणावर पलटी झाल्याने खताचे पोते खाली पडले होते. यामुळे ट्रकचे तसेच खताचे पोते यांचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज होणाऱ्या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्याचबरोबर जीव मुठीत धरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

धारूरचा घाट म्हणजे आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटाची रुंदीकरण (Ghat widening) करून त्वरित अपघाताची मालिका थांबवावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतू सदरील घाट रुंदीकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाची कायम दिरंगाई होताना दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!