माझं गाव

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या दादासाहेब मुंडे विरोधात मराठा समाजात संताप …

किल्लेधारूर दि.8 मे – जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य दादासाहेब मुंडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत मराठा व ओबीसी (OBC) समाजामध्ये वाद करणारी पोस्ट टाकून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी असे निवेदन तहसील व पोलीस प्रशासनाला सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) किल्लेधारुर तर्फे देण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

(Anger in the Maratha community against Dadasaheb Munde who made provocative statements …)

बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झालेल्या निर्णयावर मराठा विषयी “आरक्षणात तुम्ही वाटा मागतात… तुम्हाला वाटी सुद्धा भेटणार नाही”असे वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखवून मराठा आणि ओबीसी (OBC) समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे व मराठा समाजातील लोकांच्या भावना भडकावून राजकीय लाभ उठवण्याचे षडयंत्र रचले.

यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो अशा चिथावणीखोर दादासाहेब मुंडे यांना नियोजन समिती सदस्या पदावरून बरखास्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) यांनी तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाला दिले आहे. कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!