‘ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद’ … सोनू सूदचा स्पाईसजेटकडून अनोख्या पध्दतीने सन्मान.

मुंबई दि.20 मार्च- गतवर्षी जगात कोरोनाचा थैमान घातले असताना अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) या संकट काळात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. येवढेच नाही तर अनेकांच्या घरोघरी अन्नधान्य पोहोचवून लोकांसाठी देवदूत ठरला. या मदत कार्यामुळे सोनू सूदचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले. आता स्पाईस जेट या विमान कंपनीने सोनू सूदच्या या कामाचा अनोख्या पद्धतीने गौरव करत एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केले आहे.

(‘A Salute to the Savior Sonu Sood’ … Sonu Sood honored in a unique way by SpiceJet.)

गतवर्षी 2020 मध्ये कोविड -19 या साथीच्या रोगामुळे बऱ्याच नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) यावेळी गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्यामुळे भारतातील लोकांनी त्याला ‘खरा नायक’ म्हणून घोषित केले होते. सूदने संबंधित राज्य सरकारकडून परवानगी घेतल्यानंतर प्रवासी कामगारांसाठी विशेष बसेसची व्यवस्था केली होती. परप्रांतीय कामगारांना घरी पाठवण्याव्यतिरिक्त सोनू सूद याने अन्नदानाचा उपक्रम देखील सुरू केला होता आणि पंजाबमधील डॉक्टरांना 1500 पीपीई किट्सचे दान केले. जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यासह, सोनू सूदने कोरोना संकट काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील भरपूर मदत केली आहे. दुर्गम हरियाणा खेड्यातील शाळांमध्ये मुलांना त्यांच्या ऑनलाइन वर्गांसाठी स्मार्टफोन दिले. सप्टेंबरमध्ये त्यांने आसाममधील एका महिलेची ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली.

‘ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद’
सोनू सूदच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केले आहे. स्पाईसजेटने (SpiceJet) सोनू सूदला सलाम करताना आपल्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे छायाचित्र काढले आहे. या छायाचित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे. ‘ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद’ म्हणजेच ‘मसिहा सोनू सूदला सलाम.’

दरम्यान, सोनू सूदने या स्पायजेट बोईंग 737 चा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत स्पाईस जेटचे आभार मानले आहेत. तसेच, अनारक्षित तिकिटावर मोग्याहून मुंबईला आल्याची आठवण झाली. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. माझ्या नातेवाईंकांना भरपूर मिस करतोय, असे सोनू सूदने म्हटले आहे. सोनू सूद याने आनंदित होत, “या आश्चर्यकारक गोष्टीमुळे मी स्पाइसजेटचा (SpiceJet) अत्यंत आभारी आहे. लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान या विमान कंपनीने एक दिवससुद्धा काम थांबवले नाही, ते स्पाइसजेट होते, ज्याने देशाला लागणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्याची योग्य ती काळजी घेतली. स्पाइसजेटच्या अथक आणि अनमोल सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ज्यामुळे हजारो अडकलेल्या भारतीयांना त्यांच्या कुटूंबियात पुन्हा एकत्र येण्यास मदत झाली.” असे म्हणत आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!