घात-अपघात

Murder मुलाची हत्या करुन प्रेत झाडाला लटकविले ? ; गावात तणाव.

56 / 100

माजलगाव दि.18 एप्रिल – माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत एका पंधरा वर्षीय मुलाची हत्या ( Murder ) करून प्रेत झाडाला लटकविल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून सदर घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर गावात तणावपूर्णस्थिती असून पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचे कळते.

( Murder killed the child and hanged the body from the tree? ; Tension in the village. )

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यात दिंद्रुड पोलीस हद्दीतील नित्रुड येथील एक पंधरा वर्षीय युवक आपल्या बहिणी सोबत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास सरपन तोडण्यासाठी गेला होता. यावेळी दोन व्यक्तीं त्यास पकडून हाणमार करत असल्याचे पाहून त्याची बहीण घराकडे पळत आली. घरच्यानां माहिती कळताच नातेवाईक घटनास्थळाकडे गेले. नातेवाईकांना एका झाडाला मुलाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख (वय 15 वर्ष) असे मयत मुलाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ( Police ) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले आहे. दरम्यान मयत मुलाच्या नातेवाईकांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये शेकडोंच्या संख्येने जमाव केला आहे. आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. मयत मुलगा याने रोजा (उपवास) ठेवलेले असल्याचे कळते. सदर प्रकार खुनाचा कि आत्महत्या ( Suicide ) याबाबत पोलिसांनी ( Police ) कसलीही माहिती दिलेली नाही. सदर घटनेमुळे मात्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!