अंबाजोगाई अत्याचार प्रकरण; आणखी एका महिला दलाल आँटीला अटक, सहा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.

अंबाजोगाई दि.20 नोव्हेंबर – 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 400 ते 500 नराधमाने अत्याचार (Rape) केल्याची घटना शहरात घडली असून यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी एका महिला दलाल आँटीला (Aunty) अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच यापूर्वीच्या सहा आरोपींना न्यायालयाने 23 नोव्हेंबर पर्यंत आणखी पोलिस कोठडी (Police custody) सुनावली आहे.
(Ambajogai rape case; Another female broker Aunty arrested, six accused remanded in police custody for four days.)
घराबाहेर पडलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी (Minor girl) पाण्याचीटाकी बसस्थानक परिसर रोडवर येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन तरुणीस वेगवेगळ्या माध्यमातून चारशे ते पाचशे नराधमाने तिच्यावर अत्याचार करत तिच्या शरीराचे लचके तोडले आहेत. यातून ती पाच महिण्याची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई (Ambajogai) ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी काल (दि.19) अटक करण्यात आलेल्या नवीन महिला दलाल आंटीची भर पडत या प्रकरणात एकूण दोन महिला व आठ पुरुषांना पोलिसांनी (Police) अटक केली. याप्रकरणी कालपर्यंत एकूण सोळा आरोपी निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणातील अगोदरच्या सहा आरोपींना जिल्हा न्यायाधीश 2 तथा अप्पर सत्र न्यायाधीश व्हि.के.मांडे यांनी 19 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
त्यामुळे काल सहा आरोपीसह नवीन महिलेला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी पुढील तपासासाठी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायाधीश एम.बी पटवारी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Additional Sessions Judge) तीन यांनी सर्व आरोपींना 23 नोव्हेंबर पर्यंत (चार) दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्हयाचा तपास अप्पर पोलीस अधिक्षक (Upper Superintendent of Police) कविता नेरकर-पवार हे करत आहेत.