बीड कोरोना अपडेट; 24 तासात 2 कोरोना बळी, पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.11 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 920 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 12 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 908 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सात तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. काल दोन कोरोना बळींची नोंद झाली.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-4, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या झपाट्याने उतरत असताना आज किंचित वाढ दिसत आहे. मंगळवारी 10 बुधवारी 5, तर आज बाधितांची संख्या 12 आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार बुधवारी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत दोनने वाढ होवून जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2811 वरुन 2813 झाली तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 61 झाली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचीसंख्या वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या जवळपास आली आहे. राज्यात बुधवारी 1 हजार 094 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 976 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 लाख 932 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 17 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 447 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.